पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी प्रकरणी महाराष्ट्र ATSची धडक कारवाई; राज्यभरातील १५० हून अधिक ठिकाणी एकाचवेळी छापे

पाकिस्तानातील कुख्यात गँगस्टर शहजाद भट्टी याच्याशी कथित संपर्क प्रकरणी महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) मोठी कारवाई केली आहे. राज्यभरात एकाच वेळी १५० हून अधिक ठिकाणी छापेमारी करण्यात आली असून, या प्रकरणामुळे सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.

सूत्रांच्या माहितीनुसार, सोशल मीडियाच्या माध्यमातून शहजाद भट्टीशी संपर्कात असलेल्या संशयितांची माहिती ATSकडे आली होती. त्यानंतर राज्यभर समन्वित कारवाई करत विविध ठिकाणी झडती घेण्यात आली. या कारवाईदरम्यान अनेक इलेक्ट्रॉनिक उपकरणे, मोबाईल फोन, लॅपटॉप आणि महत्त्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

तपास यंत्रणा सोशल मीडिया व्यवहार, आर्थिक देवाणघेवाण आणि संशयितांच्या संपर्क साखळीचा बारकाईने तपास करत असून, राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे. या तपासातून आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *