परत……कोरोनाची दहशत, आंध्रप्रदेशात दोन जणांचा मृत्यू

आंध्र प्रदेशात तब्बल चार वर्षांनंतर पुन्हा एकदा कोरोनाच्या भीतीचे सावट निर्माण झाले असून आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे.कडप्पा जिल्ह्यातील दोन रुग्णांचा मृत्यू झाल्यानंतर प्रशासनाने खबरदारीच्या उपाययोजना अधिक वेगाने सुरू केल्या असून मृतांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेण्यात येत आहे.
सुरुवातीला तिरुपती येथे उपचार घेत असलेल्या एका साठ वर्षीय व्यक्तीची प्रकृती गंभीर झाल्यानंतर त्यांना उपचारासाठी सिएमसी वेल्लोर येथे हलवण्यात आले असता आरटी पीसीआर चाचणीत ते कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निदान करण्यात आले, याशिवाय कडप्पा जिल्ह्यातील आणखी एका 43 वर्षीय व्यक्तीचा कोरोना मुळे मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले आहे त्यांच्या छातीचे सिटी स्कॅन केले असता त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले असून त्यांच्या हि संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध सुरू आहे.मृतांपैकी एका रुग्णाला मधुमेह, मूत्रपिंडाचा आजार तसेच इतरही गंभीर आजार असल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान सध्या आढळलेल्या काही रुग्णांमध्ये ओमिक्रॉन व्हेरिएंट चा संसर्ग असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असून निश्चित माहिती मिळण्यासाठी मृत रुग्णांचे नमुने पुण्यातील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थे मध्ये पाठवण्यात आले आहेत.
दरम्यान आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या असून नागरिकांनी घाबरून न जाता योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *