Mumbai-‘शरद पवार चांगल्याला चांगलं म्हणतात; काहींना फक्त टीका करण्याची सवय’ – एकनाथ शिंदे

मुंबई | प्रतिनिधी

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या भूमिकेचे कौतुक करत विरोधकांवर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे. चांगल्या कामाचे कौतुक करण्याची शरद पवार यांची वृत्ती असल्याचे सांगत त्यांनी काही नेत्यांवर टीकाही केली.

एकनाथ शिंदे म्हणाले, “शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत. चांगल्या गोष्टीला चांगलं म्हणण्याची त्यांची वृत्ती आहे. पण काही लोकांची वृत्ती काहीही झालं तरी विरोध करायचा, जे काही बोला ते रेटून बोला अशी आहे. अशा लोकांना शरद पवारांनीच योग्य उत्तर दिलं आहे.”

शिंदे यांच्या या वक्तव्यामुळे राज्यातील राजकीय वातावरणात पुन्हा चर्चा रंगण्याची शक्यता असून, त्यांच्या या विधानाकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *