पवार कुटुंबात पुन्हा आनंदाचे वातावरण; पार्थ पवार यांचा २९ जुलैला साखरपुडा

पुणे | प्रतिनिधी

पवार कुटुंबात लवकरच पुन्हा एकदा सनई-चौघडे वाजणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार पार्थ पवार आणि कायनात धार यांचा साखरपुडा २९ जुलै रोजी पुण्यात पार पडणार आहे.

नुकताच राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)च्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या कन्या रेवती सुळे यांच्या विवाहसोहळ्याची चर्चा रंगली होती. त्यानंतर आता पवार कुटुंबात आणखी एका शुभकार्याची तयारी सुरू झाली आहे.

पार्थ पवार आणि कायनात धार यांच्या साखरपुड्याचा समारंभ पुण्यात कुटुंबीय, नातेवाईक आणि निवडक मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडणार असल्याची माहिती समोर आली आहे.

या साखरपुड्याच्या निमित्ताने पवार कुटुंबात आनंदाचे वातावरण असून, राजकीय आणि सामाजिक वर्तुळातही या समारंभाची चर्चा सुरू झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *