Satara-एफडीएच्या छाप्याच्या अफवेने दूध रस्त्यावर ओतले; माण तालुक्यातील मोही गावातील धक्कादायक प्रकार

सातारा | प्रतिनिधी

सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील मोही गावात अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) छाप्याची केवळ अफवा पसरताच दूध संकलन करणाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली. कारवाई आणि दंडाच्या भीतीने काही दूध संकलन चालकांनी शेकडो लिटर दूध थेट रस्त्याच्या कडेला ओतून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

एफडीएचे पथक कारवाईसाठी येत असल्याची चर्चा परिसरात पसरल्यानंतर अनेकांनी घाईघाईने संकलित दूध नष्ट करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. या घटनेमुळे मोठ्या प्रमाणात दुधाची नासाडी झाली असून, शेतकरी आणि दुग्ध व्यवसायिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

प्रत्यक्षात एफडीएची कारवाई होती की केवळ अफवा होती, याबाबत प्रशासनाकडून तपास सुरू करण्यात आला आहे. अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीची खातरजमा करावी, असे आवाहनही संबंधित यंत्रणांकडून करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *