Mumbai-डायमंड लीगमध्ये महाराष्ट्राचा झेंडा उंचावला; सर्वेश कुशारेचे दमदार पदार्पण, तिसऱ्या स्थानावर झेप

मुंबई : प्रतिनिधी

जागतिक ॲथलेटिक्समधील अत्यंत प्रतिष्ठेच्या डायमंड लीग स्पर्धेत महाराष्ट्राचा उंच उडीपटू सर्वेश कुशारे याने शानदार पदार्पण करत इतिहास रचला आहे. सर्वेशने 2.26 मीटरची उंच उडी यशस्वीरीत्या पार करत स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावला.

या उल्लेखनीय कामगिरीमुळे डायमंड लीगच्या इतिहासात अव्वल तीनमध्ये स्थान मिळवणारा सर्वेश हा चौथा भारतीय ॲथलिट ठरला आहे. जागतिक दर्जाच्या स्पर्धेत केलेल्या या कामगिरीमुळे भारतीय ॲथलेटिक्सला मोठी प्रेरणा मिळाली असून महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.

सर्वेश कुशारेच्या या यशाचे क्रीडा क्षेत्रातून आणि राज्यभरातून कौतुक होत असून, आगामी आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये त्याच्याकडून आणखी दमदार कामगिरीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *