Thane-माजी खासदार विनायक राऊत यांच्यासह कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल; सुनेचे कौटुंबिक हिंसाचाराचे गंभीर आरोप

प्रतिनिधी | ठाणे

ठाकरे गटाचे माजी खासदार विनायक राऊत यांच्या कुटुंबीयांविरोधात कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राऊत यांची सून गिरीजा राऊत यांनी विनायक राऊत, त्यांचा मुलगा तथा नगरसेवक गितेश राऊत आणि इतर कुटुंबीयांविरोधात गंभीर आरोप करत ठाण्यातील कापूरबावडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

गिरीजा राऊत यांच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी विनायक राऊत यांच्यासह संबंधित कुटुंबीयांविरोधात कौटुंबिक हिंसाचार तसेच महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा आणि जादूटोणा प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास कापूरबावडी पोलीस करत असून, संबंधितांकडून जबाब नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *