दुचाकीच्या धडकेत ६० वर्षीय वृद्धाचा मृत्यू, चालक पसार

आकुर्डी ते चिंचवड लिंक रोडवर रस्त्याने पायी जाणाऱ्या एका वृद्धाला पाठीमागून येणाऱ्या अज्ञात मोटारसायकलने जोराची धडक दिली. ही घटना शुक्रवारी (१० जुलै) रात्री आठ वाजण्याच्या सुमारास टयाल कॉर्प बांधकाम साईडजवळ घडली.

राजाराम जनार्धन माने (६०) असे मृत्यू झालेल्या वृद्धाचे नाव आहे. या प्रकरणात पवन राजाराम माने (२६, मोहननगर, चिंचवड) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात दुचाकी चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे वडील राजाराम माने हे आकुर्डीकडून चिंचवडकडे पायी जात होते. त्यावेळी पाठीमागून येणाऱ्या अनोळखी मोटारसायकल चालकाने आपली गाडी हयगयीने व भरधाव वेगाने चालवून त्यांना जोराची धडक दिली. या अपघातात गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला असून आरोपी चालक जखमीला कोणतीही वैद्यकीय मदत न करता व अपघाताची माहिती पोलिसांना न देता तेथून पळून गेला. निगडी पोलीस तपास करत आहेत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *