बेकायदेशीर ताडी विक्री प्रकरणी तिघांवर गुन्हा

दिघी येथील फुगेवस्ती येथे पत्राच्या शेडमध्ये विनापरवाना बेकायदेशीरपणे ताडी विक्री करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई केली. ही घटना शुक्रवारी (१० जुलै) सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडली.

या प्रकरणात पोलीस कॉन्स्टेबल लक्ष्मीकांत पतंगे यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार विशाल सुधाकर बेंदरे (३७, गणेशनगर, भोसरी), विजय अनंतय्या गौर (३५, वल्लभनगर, पिंपरी) आणि राजू नरसप्पा भंडारी (महात्मा फुलेनगर, भोसरी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखेच्या दारूबंदी पथकाने फुगेवस्ती येथे छापा टाकला. त्यावेळी आरोपींच्या ताब्यात एकूण ७० लिटर आंबट उग्र वासाचे ताडी नावाचे मादक द्रव्य मिळून आले. आरोपी ३,५०० रुपये किमतीचा हा माल विनापरवाना बाळगून स्वतःचे फायद्यासाठी चोरून विक्री करत असताना मिळून आले. दिघी पोलीस तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *