तडीपार गुंडाला कोयत्यासह अटक

पिंपरी, दि. १४ (प्रतिनिधी) – दोन वर्षांसाठी पुणे जिल्ह्यातून तडीपार करण्यात आलेल्‍या तडीपार गुंडाला पोलिसांनी अटक केली. त्‍यांच्‍याकडून एक कोयता जप्‍त करण्‍यात आला. ही कारवाई रविवारी रात्री नऊ वाजताच्‍या सुमारास करण्‍यात आली.
बुद्धभूषण माणिक पालके (वय २८, रा. मोरेवस्‍ती, चिखली) असे गुन्‍हा दाखल झालेल्‍या आरोपीचे नाव आहे. पोलीस अंमलदार संतोष सुदाम भोसर (वय ३१) यांनी सोमवारी याबाबत चिखली पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, आरोपी पालके याला संपूर्ण पुणे जिल्‍ह्यातून दोन वर्षांकरिता तडीपार केले होते. मात्र तो तडीपारी आदेशाचा भंग करून शहरात आला होता. तो चिखली परिसरात फिरत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. स्पाईन रोडवरील कारवाईत त्याच्या रिक्षाची झडती घेतली असता ५० हजार रुपयांचा लोखंडी कोयता जप्त करण्यात आला. हद्दपारीचा आदेश आणि शस्त्रबंदीचे आदेश मोडल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास चिखली पोलीस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *