पिंपरी, दि. १४ (प्रतिनिधी) – बेकायदेशीर देशी-विदेशी दारू विक्रीवर पोलिसांनी छापा टाकला. ही कारवाई पिंपरीतील बौद्धनगर परिसरात पत्राशेडमध्ये सोमवारी (दि. १३ जुलै) रोजी दुपारी पावणे चार वाजताच्या सुमारास करण्यात आली आहे.
शोभा मुरलीधर आंगरख (वय ५३, रा. बौद्धनगर, पिंपरी) असे गुन्हा दाखल झालेल्या माहिलेचे नाव आहे. पोलीस अंमलदार नंदलाल शिवाजी राऊत यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिला आरोपी बेकायदेशीररित्या दारू विक्री करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी छापटा टाकला. मात्र पोलीस आल्याची चाहूल लागताच आरोपी महिला घटनास्थळावरून गल्लीबोळातून पसार झाली. मात्र, पोलिसांनी तेथून २ हजार ४० रुपयांचा दारूचा साठा जप्त केला. महिला आरोपीविरुद्ध महाराष्ट्र प्रोहिबिशन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपरी पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.
बेकायदेशीर दारू विक्रीवर छापा; महिलेवर गुन्हा दाखल
