पिंपरी, दि. १६ (प्रतिनिधी) – पर्ल पॅलेडीअम सोसायटीत बनावट बँक खाते उघडून संघटित सायबर गुन्हेगारी टोळीला वापरण्यास दिले. त्याद्वारे दोन नागरिकांची २३ लाख २३ हजार ३४१ रुपयांची फसवणूक केली. हा प्रकार १३ जानेवारी ते ३० जून २०२६ दरम्यान रहाटणी येथे घडला.
प्रेम नंदू लोखंडे (वय १९, रा. ड्रायव्हर कॉलनी, थेरगाव) या आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस शिपाई भास्कर किसन भारती (वय ३२) यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी प्रेम लोखंडे याने स्वतःच्या नावे ‘जळगाव जनता सहकारी बँकेत’ खाते उघडले होते. हे खाते सायबर टोळीला वापरण्यास देऊन त्यावर २३ लाख २३ हजार ३४१ रुपयांचे आर्थिक व्यवहार केले. या खात्याद्वारे भारतातील दोन नागरिकांची दोन लाख ६२ हजार ९४८ रुपयांची फसवणूक झाल्याचे उघड झाले आहे. पुढील तपास काळेवाडी पोलीस करीत आहेत.
बँक खात्याचा गैरवापर करून २३ लाख रुपयांची फसवणूक
