हातभट्टी दारू विक्री प्रकरणी आरोपी जेरबंद

पिंपरी, दि. १६ (प्रतिनिधी) – मानवी जीवितास घातक असणारी बेकायदेशीर गावठी हातभट्टी दारू विक्री करत असताना गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून एका आरोपीला अटक केली आहे. ही कारवाई १५ जुलै २०२६ रोजी दुपारी सव्वाबारा वाजेच्या सुमारास शिरगाव येथील गहुंजे रस्त्याच्या कडेला करण्यात आली.
विनायक ईश्वर राजपूत (वय २५, रा. कंजारभट वस्ती, शिरगाव) या आरोपीला अटक केली आहे. गुन्हे शाखा दारूबंदी विरोधी पथकाचे पोलीस नाईक सचिन वामनराव गोनटे (वय ३५) यांनी फिर्याद दिली आहे. ​पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विनायक हा शासनाने प्रतिबंधित केलेली गावठी हातभट्टीची तयार दारू स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी बेकायदेशीरपणे विकत होता. पोलिसांनी त्‍याच्‍याकडून दोन हजार ८०० रुपये किंमतीचा २८ लिटर रसायनमिश्रित दारूचा साठा जप्त केला आहे. पुढील तपास शिरगाव पोलीस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *