काळभोरनगरमधून ‘एमडी’ ड्रग्ज तस्कर अटकेत
पिंपरी, दि. १६ (प्रतिनिधी) – काळभोर नगर येथे सह्याद्री इंडस्ट्रीजसमोरील सार्वजनिक रस्त्यावर अंमली पदार्थांची विक्री करण्यासाठी आलेल्या एका तस्कराला पोलिसांनी कारसह अटक केली आहे. १५ जुलै २०२६ रोजी दुपारी पावणेतीन वाजेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.
शिवा भारत निमजे (वय ३५, रा. तळेगाव दाभाडे) या आरोपीला अटक केली आहे. पिंपरी पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार अशोक लक्ष्मण डगळे (वय ४२) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शिवा निमजे हा त्याच्या वॅगनआर कार (एमएच १४ केजे५००४) यामधूनअंमली पदार्थांची तस्करी करत होता. पोलिसांनी सापळा रचून त्याच्याकडून १८ हजार २०० रुपये किमतीची ३.६४ ग्रॅम एमडी पावडर आणि ५ लाख रुपयांची कार असा मुद्देमाल जप्त केला आहे. पुढील तपास पिंपरी पोलीस करीत आहेत.