पिंपरी, दि. १६ (प्रतिनिधी) – अंमली पदार्थ विरोधी पथकाने कारवाई करून एका मोठ्या ड्रग्ज तस्कराला अटक केली आहे. १५ जुलै २०२६ रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास पुनावळे येथे ही कारवाई करण्यात आली.
राजाराम जगाराम चौधरी (वय ४२, रा. दुलिफ इंफिनिटी लेबर कॅम्प, पुनावळे) याला अटक केली आहे. अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस शिपाई गोविंद देवराव डोके (वय ३४) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी राजाराम हा बेकायदेशीरपणे अंमली पदार्थाची विक्री करत होता. पोलिसांनी त्याच्याकडून ६३ हजार रुपये किमतीचा २०० ग्रॅम ‘डुडा अफू’ वनस्पतीचा सुकवलेल्या बोडांचा चुरा (पॉपि स्ट्रॉ), एक मोबाइल आणि दुचाकी जप्त केली. हा माल त्याला सुमेर बिश्नोई (रा. पत्ता माहीत नाही) याने पुरवल्याचे समोर आले आहे. पुढील तपास रावेत पोलीस करीत आहेत.
पुनावळे येथे ’पॉपि स्ट्रॉ’ तस्कर गजाआड
