पिंपरी, दि. १६ (प्रतिनिधी) – बेकायदेशीरपणे गांजाची विक्री करण्यासाठी आलेल्या एका तस्कराला अंमली पदार्थ विरोधी पथकाने कारवाई केली आहे. ही कारवाई १५ जुलै २०२६ रोजी सायंकाळी पावणेसहा वाजेच्या सुमारानिगडी येथील ओटा स्किम परिसरातील अहिंसक महाबुद्ध विहारसमोर करण्यात आली.
कलीम कादर शेख (वय ४२, रा. ओटा स्किम, निगडी) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस शिपाई प्रतीक संभाजी कवडे (वय ३१) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी कलीम शेख हा निगडी येथील पेरूची बाग परिसरात गांजा विक्रीसाठी थांबला होता. पोलिसांनी त्याच्याकडून १६ हजार ३०० रुपये किमतीचा ३१८ ग्रॅम वजनाचा गांजा आणि ४०० रुपयांची रोकड जप्त केली आहे. पुढील तपास निगडी पोलीस करीत आहेत.
गांजा विक्री करणाऱ्यावर कारवाई
