पुणे :
घरगुती स्वयंपाकाची आवड आता कमाईचे प्रभावी साधन ठरू शकते. महिलांना, गृहिणींना आणि युवक-युवतींना कमी गुंतवणुकीत स्वतःचा खाद्य व्यवसाय सुरू करता यावा, यासाठी अमृत (Academy of Maharashtra Research, Upliftment and Training) संस्थेतर्फे २१ आणि २२ जुलै २०२६ रोजी पुण्यात ‘अमृत अन्नपूर्णा क्लाउड किचन ट्रेनिंग प्रोग्राम’ आयोजित करण्यात आला आहे.
ऑनलाइन फूड डिलिव्हरी सेवांना वाढती मागणी आणि घरगुती खाद्यपदार्थांना मिळणारा उत्तम प्रतिसाद लक्षात घेऊन हे विशेष प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. स्वतःचा क्लाउड किचन व्यवसाय सुरू करण्याची इच्छा असलेल्या नवउद्योजकांसाठी हा उपक्रम मार्गदर्शक ठरणार आहे.
दोन दिवसांच्या प्रशिक्षणात एफएसएसएआय (FSSAI) परवाना प्रक्रिया, Swiggy आणि Zomato वर व्यवसायाची नोंदणी, मेनू नियोजन, आकर्षक पॅकेजिंग, ब्रँडिंग, डिजिटल मार्केटिंग, ग्राहक व्यवस्थापन आणि व्यवसाय वाढीच्या प्रभावी रणनीती याबाबत तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांसह प्रशिक्षण दिले जाणार असून, प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या सहभागीांना प्रमाणपत्रही देण्यात येणार आहे.
महिलांच्या उद्योजकतेला चालना देणे, युवकांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे आणि घरगुती उद्योगांना प्रोत्साहन देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. प्रशिक्षणासाठी प्रवेश मर्यादित असून ‘प्रथम नोंदणी, प्रथम प्राधान्य’ या तत्त्वावर सहभागींची निवड केली जाणार आहे.
अधिक माहितीसाठी जिल्हा व्यवस्थापक सिद्धेश केसकर (मो. ९३५९४०३८९१) किंवा अमृत पुणे जिल्हा कार्यालय (मो. ९११२२२८७६७) येथे संपर्क साधावा. तसेच अमृतच्या अधिकृत संकेतस्थळावरूनही ऑनलाइन नोंदणी करता येणार आहे.
