पिंपरी, दि. 19 (प्रतिनिधी) – पैशांच्या देवाणघेवाणीवरून आणि बहिणीशी न बोलण्यास सांगितल्याच्या कारणावरून एका २४ वर्षीय तरुणाचा गळा दाबून खून करण्यात आला. ही घटना १५ जुलै रोजी माण येथील राक्षे वस्तीत घडली आहे.
प्रणव वाळेकर, अनिकेत शिंदे (दोघे रा. माण, मुळशी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तसेच अथर्व चिव्हे (रा. पुरंदर) याच्या विरोधातही गुन्हा दाखल केला आहे. रंगनाथ अंकुश मोगरे (वय ४३, रा. माण, मुळशी) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीचा मुलगा गणेश याने आरोपी प्रणवचे पैसे न दिल्याने व बहिणीशी न बोलण्याची समज दिल्याने, आरोपींनी त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली व प्रणवने गळा दाबून त्याचा खून केला. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.
पैशांच्या वादातून तरुणाचा गळा दाबून खून
