पतीच्या त्रासाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

पिंपरी, दि. 19 (प्रतिनिधी) – पतीच्या सततच्या शारीरिक व मानसिक त्रासाला कंटाळून एका २४ वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना भोसरी येथील श्रीराम कॉलनीमध्ये उघडकीस आली आहे.
विद्या अंकुश राठोड (वय २४) असे आत्‍महत्‍या केलेल्‍या विवाहितेचे नाव आहे. याबाबत तिचा पती अंकुश भगवान राठोड (वय २९, रा. श्रीराम कॉलनी, भोसरी) असे अटक केलेल्‍या आरोपीचे नाव आहे. याबाबत मयत विद्या यांचे वडिल सुखदेव रामचंद्र चव्हाण (वय ४६, रा. मंडणगड, रत्नागिरी) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुलै २०२४ पासून आरोपी पती फिर्यादीची मुलगी विद्या हिला सतत मारहाण व शिवीगाळ करत होता. या छळाला कंटाळून तिने राहत्या घरी गळफास घेतला. भोसरी पोलीस याबाबत तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *