Skip to content
-
Subscribe to our newsletter & never miss our best posts. Subscribe Now!
  • https://www.facebook.com/
  • https://twitter.com/
  • https://t.me/
  • https://www.instagram.com/
  • https://youtube.com/
Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ

Company

  • About Us
  • Contact
  • Advertise
  • Reprints & Licensing
  • Help Center
  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
Subscribe
Close

Search

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
  • https://www.facebook.com/
  • https://twitter.com/
  • https://t.me/
  • https://www.instagram.com/
  • https://youtube.com/
पिंपरी-चिंचवड

Pimpri-Chinchwad-सायबर फसवणुकीसाठी बँक खात्यांचा गैरवापर उघड! पिंपरी-चिंचवडमध्ये तीन गुन्हे; लाखोंच्या संशयास्पद व्यवहारांचा पर्दाफाश

By Sumedh Chapalgaonkar
July 20, 2026 2 Min Read
0

पिंपरी, दि. २० (प्रतिनिधी) – सायबर गुन्हेगारांकडून बँक खात्यांचा वापर करून देशभरातील नागरिकांची ऑनलाइन फसवणूक केली. याप्रकरणी पिंपरी, सांगवी आणि वाकड पोलीस ठाण्यांत तीन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पहिल्या प्रकरणात पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपरी गावातील शिवशक्ती अपार्टमेंट परिसरात सप्टेंबर ते डिसेंबर २०२५ या कालावधीत आरोपीने अक्षय हेमंत गायकवाड यांच्या नावाने द कॉसमॉस को-ऑपरेटिव्ह बँकेत खाते उघडले. त्यानंतर साथीदारांच्या मदतीने या खात्याद्वारे १९ हजार १०० रुपयांचे संशयास्पद व्यवहार करण्यात आले. या व्यवहारांच्या माध्यमातून देशातील दोन नागरिकांची ऑनलाइन फसवणूक झाल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.
दुसरे प्रकरण सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. आरोपीने सुजल संताजी माने यांच्या नावाने आयडीएफसी बँकेत खाते उघडून मार्च ते जुलै २०२६ या कालावधीत तब्बल २ लाख ७५ हजार रुपयांचे व्यवहार केले. या खात्याचा वापर करून देशातील दोन नागरिकांची २ लाख ४९ हजार ८५४ रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचे तपासात उघड झाले आहे. हे खाते पिंपळे सौदागर येथील पत्त्यावर नोंदणीकृत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
तिसऱ्या प्रकरणात वाकड पोलीस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपळे निलख येथील विकास गजानन भुजबळ याने साथीदारांसह आयडीएफसी फर्स्ट बँकेत खाते उघडून संघटित गुन्हेगारीच्या उद्देशाने त्याचा वापर केल्याचा आरोप आहे. या खात्यावर तब्बल ८ लाख ८८ हजार ३८२ रुपयांचे आर्थिक व्यवहार झाल्याचे तपासात समोर आले आहे. या माध्यमातून देशातील चार नागरिकांची एकूण १ लाख २७ हजार रुपयांची फसवणूक झाल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.
या तिन्ही प्रकरणांमध्ये बँक खाती ही सायबर फसवणूक आणि संशयास्पद आर्थिक व्यवहारांसाठी वापरली गेल्याचे स्पष्ट झाले आहे. अशा गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या सर्व आरोपींचा शोध सुरू असून त्यांच्या इतर साथीदारांचाही तपास केला जात आहे. नागरिकांनी कोणत्याही व्यक्तीला कमिशन किंवा आर्थिक मोबदल्याच्या आमिषाने स्वतःचे बँक खाते, एटीएम कार्ड, चेकबुक किंवा ओटीपी देऊ नये, असे आवाहन पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखेने केले आहे.

Tags:

Pimpri-Chinchwad: Misuse of bank accounts for cyber fraud exposed! Three cases registered in Pimpri-Chinchwad; suspicious transactions worth lakhs uncovered.
Author

Sumedh Chapalgaonkar

Follow Me
Other Articles
Previous

Delhi-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ज्येष्ठ उद्योगपती रवी कांत यांच्याशी भेट

Next

Pimpri-Chinchwad-मोशीतील विषारी धुरावर महापौरांचा बडगा प्लास्टिक-टायर जाळणाऱ्यांवर कठोर कारवाईचे आदेश

No Comment! Be the first one.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECENT POSTS

  • शतक महोत्सवी मराठी साहित्य संमेलनासाठी शासनाकडून भरीव निधी मराठीच्या जागतिक प्रचारासाठी राज्य कटिबद्ध; उदय सामंत यांची घोषणा
  • अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी आरोपीला १० वर्षांची सक्तमजुरी विशेष पोक्सो न्यायालयाचा निर्णय; २५ हजारांचा दंड, निगडी पोलीसांच्या तपासाला यश
  • उद्या निगडीत वाहतुकीत बदल भक्ती-शक्ती परिसरात गर्दीची शक्यता; वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन
  • कॅप्टन अमोल महाडिक यांचा सहकाऱ्यांसह काँग्रेस पक्षात प्रवेश. आरक्षणाच्या मुद्द्यावरून जाती जातीत भांडणे पेटवण्याचा सरकारचा प्रयत्न
  • Pimpri-Chinchwad-पिंपरी चिंचवड लोडशेडिंगमुक्त करण्यासाठी आमदार शंकर जगताप यांचा “मास्टर प्लॅन”

CATEGORIES

  • Uncategorized (478)
  • क्राईम (264)
  • देश (42)
  • पिंपरी-चिंचवड (908)
  • पुणे (141)
  • मनोरंजन (1)
  • राजकीय (95)
  • राज्य (189)
  • हेल्थ (3)

Latest News

  • शतक महोत्सवी मराठी साहित्य संमेलनासाठी शासनाकडून भरीव निधी मराठीच्या जागतिक प्रचारासाठी राज्य कटिबद्ध; उदय सामंत यांची घोषणा
  • अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी आरोपीला १० वर्षांची सक्तमजुरी विशेष पोक्सो न्यायालयाचा निर्णय; २५ हजारांचा दंड, निगडी पोलीसांच्या तपासाला यश
  • उद्या निगडीत वाहतुकीत बदल भक्ती-शक्ती परिसरात गर्दीची शक्यता; वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन
July 31, 2026

शतक महोत्सवी मराठी साहित्य संमेलनासाठी शासनाकडून भरीव निधी मराठीच्या जागतिक प्रचारासाठी राज्य कटिबद्ध; उदय सामंत यांची घोषणा

Sumedh Chapalgaonkar

पुणे : शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या भव्य आयोजनासाठी राज्य शासनाकडून भरीव निधी उपलब्ध...

Read More
July 31, 2026
July 31, 2026

अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी आरोपीला १० वर्षांची सक्तमजुरी विशेष पोक्सो न्यायालयाचा निर्णय; २५ हजारांचा दंड, निगडी पोलीसांच्या तपासाला यश

Sumedh Chapalgaonkar

पिंपरी, दि. ३१ (प्रतिनिधी) – अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचाराच्या प्रयत्नप्रकरणी पिंपरी-चिंचवड येथील विशेष पोक्सो न्यायालयाने...

Read More
July 31, 2026
July 31, 2026

उद्या निगडीत वाहतुकीत बदल भक्ती-शक्ती परिसरात गर्दीची शक्यता; वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

Sumedh Chapalgaonkar

पिंपरी-चिंचवड ः साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त शनिवारी (१ ऑगस्ट) रोजी निगडीतील भक्ती-शक्ती...

Read More
July 31, 2026
July 31, 2026

कॅप्टन अमोल महाडिक यांचा सहकाऱ्यांसह काँग्रेस पक्षात प्रवेश. आरक्षणाच्या मुद्द्यावरून जाती जातीत भांडणे पेटवण्याचा सरकारचा प्रयत्न

Sumedh Chapalgaonkar

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांचे भाचे कॅप्टन अमोल महाडिक यांनी आज...

Read More
July 31, 2026
July 31, 2026

Pimpri-Chinchwad-पिंपरी चिंचवड लोडशेडिंगमुक्त करण्यासाठी आमदार शंकर जगताप यांचा “मास्टर प्लॅन”

Sumedh Chapalgaonkar

– महावितरणच्या ‘प्रकाश भवन’ कार्यालयामध्ये शहरातील वीज प्रश्नांवर महत्वपूर्ण बैठक – पिंपरी-चिंचवडसह राजगुरुनगर, लोणावळ्यासाठी नवीन...

Read More
July 31, 2026
July 30, 2026

सराईत वाहन चोरट्यांना अटक; पाच वाहने जप्त

Sumedh Chapalgaonkar

चिखली पोलिसांनी दोन सराईत वाहन चोरांना अटक केली. त्यांच्याकडून चार दुचाकी आणि एक रिक्षा अशी...

Read More
July 30, 2026
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Jul    
Copyright 2026 — Newsbeez. All rights reserved. Blogsy WordPress Theme