Delhi-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ज्येष्ठ उद्योगपती रवी कांत यांच्याशी भेट
नवी दिल्ली :
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशातील ज्येष्ठ उद्योगपती आणि उद्योगक्षेत्रातील मान्यवर व्यक्तिमत्त्व रवी कांत यांची भेट घेतली. यावेळी रवी कांत यांनी आपल्या ‘Leading from the Back – To Achieve the Impossible’ या पुस्तकाची प्रत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेट म्हणून प्रदान केली.
या भेटीदरम्यान नेतृत्व, उद्योग, व्यवस्थापन आणि देशाच्या विकासाशी संबंधित विविध विषयांवर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. उद्योगक्षेत्रातील त्यांच्या दीर्घ अनुभवावर आधारित हे पुस्तक नेतृत्वाच्या नव्या संकल्पना आणि अशक्य वाटणारी उद्दिष्टे साध्य करण्याच्या प्रेरणादायी प्रवासावर प्रकाश टाकते.