Mumbai-बांग्लादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाचा १३ सदस्यीय संघ जाहीर; कमिन्स, हेजलवूड आणि लायनचे पुनरागमन.
मुंबई
ऑस्ट्रेलियाने ऑगस्टमध्ये बांग्लादेशविरुद्ध होणाऱ्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी १३ सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. दुखापतीतून सावरल्यानंतर कर्णधार पॅट कमिन्स, वेगवान गोलंदाज जोश हेजलवूड आणि अनुभवी फिरकीपटू नाथन लायन यांचे संघात पुनरागमन झाले आहे.
या तिघांच्या पुनरागमनामुळे अष्टपैलू वेगवान गोलंदाज मायकल नेसर याला मुख्य संघातून बाहेर ठेवण्यात आले आहे. अनुभवी खेळाडूंच्या पुनरागमनामुळे ऑस्ट्रेलियाचा संघ अधिक मजबूत झाल्याचे मानले जात आहे.
बांग्लादेशविरुद्धची ही मालिका जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या (WTC) दृष्टीने महत्त्वाची असल्याने दोन्ही संघांसाठी विजयाला विशेष महत्त्व असणार आहे.