Delhi-संसद मार्चनंतर दिल्ली पोलिसांची कारवाई तीव्र; अनेक गुन्हे दाखल, सुमारे ७० आंदोलक ताब्यात
नवी दिल्ली :
दिल्लीतील संसद मार्च आंदोलनादरम्यान झालेल्या गोंधळानंतर दिल्ली पोलिसांनी कारवाई अधिक तीव्र केली आहे. या प्रकरणी अनेक एफआयआर दाखल करण्यात आल्या असून, सुमारे ७० आंदोलकांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
दिल्ली पोलिसांच्या म्हणण्यानुसार, ताब्यात घेण्यात आलेल्या व्यक्तींमध्ये एकाही विद्यार्थ्याचा समावेश नाही. आंदोलनादरम्यान कायदा व सुव्यवस्था बिघडविणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करण्यात येत असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान, मध्यरात्रीनंतर आंदोलक पुन्हा जंतर-मंतर परिसरात परतल्याची माहिती समोर आली आहे. दुसरीकडे, केंद्रीय मंत्री जेपी नड्डा यांनी जंतर-मंतरवरील आंदोलनस्थळी कोणतीही कारवाई केली जाणार नसल्याचे आश्वासन दिल्याचेही सांगितले जात आहे.
NEET पेपरफुटी प्रकरण आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून सुरू असलेल्या आंदोलनामुळे राजधानीतील राजकीय वातावरण अद्यापही तापलेले आहे.