पिंपरी, दि. २२ (प्रतिनिधी) – बंदी आदेशाचे उल्लंघन करून घातक लोखंडी तलवार बाळगल्याप्रकरणी एका तरुणावर कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई मंगळवारी (२१ जुलै) दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास वल्लभनगर येथे करण्यात आली.
याबाबत पोलीस कॉन्स्टेबल अमोल काकडे यांनी संत तुकारामनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अमोल बाळू जाधव (३६, औंध, पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत घातक शस्त्र बाळगण्यास बंदी असताना आरोपीने १ हजार रुपये किमतीची तलवार जवळ बाळगली होती. संशयितरीत्या थांबलेल्या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेऊन तलवार जप्त केली. संत तुकारामनगर पोलीस तपास करीत आहेत.
वल्लभनगर येथे तलवार बाळगणाऱ्या तरुणाला अटक
