पिंपरी, दि. २३ (प्रतिनिधी) – बेकायदेशीरपणे गावठी हातभट्टी दारूची वाहतूक करणाऱ्या एका महिलेला दारूबंदी पथकाने पकडले. ही कारवाई बुधवार, दि. २२ जुलै रोजी सकाळी ०९.२५ वाजताच्या सुमारास खेड तालुक्यातील येलवाडी येथे करण्यात आली.
गुंजन शंकर राठोड (वय २०, रा. येलवाडी, ता. खेड, जि. पुणे) हिला अटक केली आहे. तसेच तिला दारू पुरवणारा गणेश राठोड (रा. मरकळ, ता. खेड) याच्यावरही गुन्हा दाखल केला आहे. दारूबंदी पथकाच्या पोलीस शिपाई ज्योती शेखर बारणे (वय ३०) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, येलवाडीतील कंजारभट वस्तीजवळ आरोपी महिला मानवी जीवितास धोकादायक ठरू शकणारी तीन हजार १०० रुपयांची ३१ लिटर गावठी हातभट्टीची दारू आपल्या ६० हजार रुपये किमतीच्या स्कुटीवरून बेकायदेशीरपणे वाहतूक करताना मिळून आली. ही दारू गणेश राठोड याने पुरवल्याचे उघड झाले. पुढील तपास दक्षिण महाळुंगे पोलीस करत आहेत.
दुचाकीवरून दारूची वाहतूक; महिलेस अटक
