पिंपरी, दि. २३ (प्रतिनिधी) – एका बेकरीत बालमजुराला कामावर ठेवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना केशवनगर, चिंचवड येथे उघडकीस आली.
या प्रकरणी आरोपी बेकरी चालक समशेर जाकीर अन्सारी (वय ४०, रा. श्रीराम कॉलनी, चिंचवडे नगर, चिंचवड) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार सुनील देवजी आंब्रे (वय ४५) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने उत्तर प्रदेशातील बालकामगाराला डेली फ्रेश बेकरी येथे कामावर ठेवले होते. त्याच्या इच्छेविरुद्ध त्याच्याकडून प्रमाणापेक्षा जास्त काम करून घेतले जात होते. काम करूनही त्याला पगार न देता शिवीगाळ करून हाताने मारहाण करण्यात येत होती.
या प्रकरणी चिंचवड पोलीस पुढील तपास करत आहेत.
बालमजुरी प्रकरणी बेकरी मालकावर गुन्हा दाखल
