Skip to content
-
Subscribe to our newsletter & never miss our best posts. Subscribe Now!
  • https://www.facebook.com/
  • https://twitter.com/
  • https://t.me/
  • https://www.instagram.com/
  • https://youtube.com/
Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ

Company

  • About Us
  • Contact
  • Advertise
  • Reprints & Licensing
  • Help Center
  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
Subscribe
Close

Search

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
  • https://www.facebook.com/
  • https://twitter.com/
  • https://t.me/
  • https://www.instagram.com/
  • https://youtube.com/
पिंपरी-चिंचवड

Pimpri-Chinchwad-दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील पोलिस कारवाईच्या निषेधार्थ नेहरूनगर न्यायालयात वकिलांचे आंदोलन; विद्यार्थ्यांच्या मागण्यांना पाठिंबा

By Sumedh Chapalgaonkar
July 24, 2026 2 Min Read
0

पिंपरी, २४ जुलै : दिल्ली येथे विद्यार्थ्यांनी विविध शैक्षणिक प्रश्नांबाबत सुरू केलेल्या आंदोलनादरम्यान झालेल्या पोलिस कारवाईच्या निषेधार्थ तसेच विद्यार्थ्यांच्या मागण्यांना पाठिंबा दर्शविण्यासाठी पिंपरी-चिंचवड शहरातील वकिलांच्या वतीने शुक्रवारी नेहरूनगर न्यायालय परिसरात निषेध आंदोलन करण्यात आले. आंदोलनात शहरातील वकिलांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत विद्यार्थ्यांवरील कारवाईचा निषेध केला. न्यायालयीन कामकाजासाठी आलेले नागरिक आणि कायद्याचे शिक्षण घेणारे विद्यार्थीही आंदोलनात सहभागी झाले.

या प्रसंगी विविध वकिलांनी मनोगत व्यक्त करत लोकशाही व्यवस्थेत विद्यार्थ्यांना शांततामय मार्गाने आंदोलन करण्याचा अधिकार असून अशा आंदोलनांवर दडपशाहीचे धोरण स्वीकारणे लोकशाही मूल्यांना बाधा पोहोचवणारे असल्याचे मत व्यक्त केले. विद्यार्थ्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर संवाद साधून मार्ग काढण्याऐवजी त्यांच्यावर बलप्रयोग झाल्याचा आरोप करत संबंधित घटनेची निष्पक्ष चौकशी करून जबाबदार पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.

उपस्थितांनी विद्यार्थ्यांनी मांडलेल्या मागण्या रास्त असल्याचे सांगत केंद्र सरकारने त्याबाबत तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा तसेच केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी या प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणीही आंदोलनातून करण्यात आली. विद्यार्थ्यांवरील अन्यायाविरोधात समाजातील सर्व घटकांनी एकत्र येण्याची आवश्यकता असल्याचे मत अनेक वक्त्यांनी व्यक्त केले.

आंदोलनादरम्यान “विद्यार्थ्यांना न्याय मिळालाच पाहिजे”, “विद्यार्थी एकजुटीचा विजय असो”, “वकील एकजुटीचा विजय असो”, “लोकशाहीचा विजय असो” तसेच “धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या” अशा घोषणांनी न्यायालय परिसर दणाणून गेला. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष न करता त्यांच्याशी संवाद साधून तोडगा काढावा, अशी भूमिका उपस्थितांनी मांडली.

या आंदोलनात ॲड. ज्योती सोरखडे, ॲड. वंदना सोरखडे, ॲड. मनीषा महाजन, ॲड. संगीता परब, ॲड. कांता गोरडे, ॲड. सुषमा नामदास, ॲड. धनंजय कोकणे, ॲड. गणेश राऊत, ॲड. अजिंक्य मराठे, ॲड. नितेश कोटांगळे, ॲड. धीरज कुचेरिया, ॲड. अब्दुल करीम, ॲड. धम्मराज साळवे, ॲड. संजय जाधव, ॲड. गणपत काकडे, ॲड. प्रताप साबळे, ॲड. संभाजी वाघमारे, ॲड. मुकुंद ओव्हाळ, ॲड. प्रशांत बचुटे, ॲड. बडगुजर, ॲड. शिप्रा धुंदी यांच्यासह पिंपरी-चिंचवड शहरातील अनेक वकील बंधू-भगिनी, कायद्याचे विद्यार्थी साक्षी पाटोळे, साक्षी राक्षे, मोहिनी लवंगे, तेजश्री भोसले व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आंदोलनाचे आयोजन पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट बार असोसिएशनचे विद्यमान सचिव ॲड. उमेश खंदारे, महिला सचिव ॲड. रीना मगदूम आणि ॲड. संकेत सरोदे यांनी केले.

प्रतिक्रिया-
“भारतीय राज्यघटनेने प्रत्येक नागरिकाला शांततामय आंदोलन आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार दिला आहे. विद्यार्थ्यांवर झालेली पोलिस कारवाई या घटनात्मक मूल्यांच्या विरोधात असून या घटनेची निष्पक्ष चौकशी करून दोषी आढळणाऱ्या संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर तातडीने सकारात्मक निर्णय घेऊन त्यांच्या प्रश्नांचे निराकरण करावे. लोकशाहीत संवाद हा मार्ग असला पाहिजे, दडपशाही नव्हे.” – ॲड. उमेश खंदारे (सचिव, पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट बार असोसिएशन)

“जंतर-मंतर आंदोलनात सहभागी झालेल्या कोणत्याही विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल झाले असतील, तर अशा विद्यार्थ्यांना पिंपरी-चिंचवड अॅडव्होकेट बार असोसिएशनच्या तर्फे मोफत कायदेशीर मदत व जामीन प्रक्रियेसाठी सहकार्य करण्यात येईल.” -ॲड. रीना मगदूम (महिला सचिव, पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट बार असोसिएशन)

Tags:

extending support to the students' demands.Pimpri-Chinchwad: Lawyers stage a protest at the Nehrunagar court against the police action on students in Delhi
Author

Sumedh Chapalgaonkar

Follow Me
Other Articles
Previous

संवादातून तणाव निवळला : पुणे पोलिसांच्या समन्वयाने हिंदू संघटनांनी आंदोलन मागे घेतले

Next

Delhi-जंतर-मंतर आंदोलनात पॅलेट गन वापरली का? सीआरपीएफकडून चौकशी; राहुल गांधींचा गंभीर आरोप

No Comment! Be the first one.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECENT POSTS

  • शतक महोत्सवी मराठी साहित्य संमेलनासाठी शासनाकडून भरीव निधी मराठीच्या जागतिक प्रचारासाठी राज्य कटिबद्ध; उदय सामंत यांची घोषणा
  • अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी आरोपीला १० वर्षांची सक्तमजुरी विशेष पोक्सो न्यायालयाचा निर्णय; २५ हजारांचा दंड, निगडी पोलीसांच्या तपासाला यश
  • उद्या निगडीत वाहतुकीत बदल भक्ती-शक्ती परिसरात गर्दीची शक्यता; वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन
  • कॅप्टन अमोल महाडिक यांचा सहकाऱ्यांसह काँग्रेस पक्षात प्रवेश. आरक्षणाच्या मुद्द्यावरून जाती जातीत भांडणे पेटवण्याचा सरकारचा प्रयत्न
  • Pimpri-Chinchwad-पिंपरी चिंचवड लोडशेडिंगमुक्त करण्यासाठी आमदार शंकर जगताप यांचा “मास्टर प्लॅन”

CATEGORIES

  • Uncategorized (478)
  • क्राईम (264)
  • देश (42)
  • पिंपरी-चिंचवड (908)
  • पुणे (141)
  • मनोरंजन (1)
  • राजकीय (95)
  • राज्य (189)
  • हेल्थ (3)

Latest News

  • शतक महोत्सवी मराठी साहित्य संमेलनासाठी शासनाकडून भरीव निधी मराठीच्या जागतिक प्रचारासाठी राज्य कटिबद्ध; उदय सामंत यांची घोषणा
  • अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी आरोपीला १० वर्षांची सक्तमजुरी विशेष पोक्सो न्यायालयाचा निर्णय; २५ हजारांचा दंड, निगडी पोलीसांच्या तपासाला यश
  • उद्या निगडीत वाहतुकीत बदल भक्ती-शक्ती परिसरात गर्दीची शक्यता; वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन
July 31, 2026

शतक महोत्सवी मराठी साहित्य संमेलनासाठी शासनाकडून भरीव निधी मराठीच्या जागतिक प्रचारासाठी राज्य कटिबद्ध; उदय सामंत यांची घोषणा

Sumedh Chapalgaonkar

पुणे : शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या भव्य आयोजनासाठी राज्य शासनाकडून भरीव निधी उपलब्ध...

Read More
July 31, 2026
July 31, 2026

अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी आरोपीला १० वर्षांची सक्तमजुरी विशेष पोक्सो न्यायालयाचा निर्णय; २५ हजारांचा दंड, निगडी पोलीसांच्या तपासाला यश

Sumedh Chapalgaonkar

पिंपरी, दि. ३१ (प्रतिनिधी) – अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचाराच्या प्रयत्नप्रकरणी पिंपरी-चिंचवड येथील विशेष पोक्सो न्यायालयाने...

Read More
July 31, 2026
July 31, 2026

उद्या निगडीत वाहतुकीत बदल भक्ती-शक्ती परिसरात गर्दीची शक्यता; वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

Sumedh Chapalgaonkar

पिंपरी-चिंचवड ः साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त शनिवारी (१ ऑगस्ट) रोजी निगडीतील भक्ती-शक्ती...

Read More
July 31, 2026
July 31, 2026

कॅप्टन अमोल महाडिक यांचा सहकाऱ्यांसह काँग्रेस पक्षात प्रवेश. आरक्षणाच्या मुद्द्यावरून जाती जातीत भांडणे पेटवण्याचा सरकारचा प्रयत्न

Sumedh Chapalgaonkar

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांचे भाचे कॅप्टन अमोल महाडिक यांनी आज...

Read More
July 31, 2026
July 31, 2026

Pimpri-Chinchwad-पिंपरी चिंचवड लोडशेडिंगमुक्त करण्यासाठी आमदार शंकर जगताप यांचा “मास्टर प्लॅन”

Sumedh Chapalgaonkar

– महावितरणच्या ‘प्रकाश भवन’ कार्यालयामध्ये शहरातील वीज प्रश्नांवर महत्वपूर्ण बैठक – पिंपरी-चिंचवडसह राजगुरुनगर, लोणावळ्यासाठी नवीन...

Read More
July 31, 2026
July 30, 2026

सराईत वाहन चोरट्यांना अटक; पाच वाहने जप्त

Sumedh Chapalgaonkar

चिखली पोलिसांनी दोन सराईत वाहन चोरांना अटक केली. त्यांच्याकडून चार दुचाकी आणि एक रिक्षा अशी...

Read More
July 30, 2026
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Jul    
Copyright 2026 — Newsbeez. All rights reserved. Blogsy WordPress Theme