Delhi-धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर कन्हैया कुमारांचा मोदी सरकारवर निशाणा; “आता पंतप्रधान नरेंद्र मोदींची पाळी”
नवी दिल्ली : नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणावरून देशभरात उसळलेल्या विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी शनिवारी (२५ जुलै २०२६) आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेस नेते कन्हैया कुमार यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर प्रतिक्रिया देताना कन्हैया कुमार यांनी लिहिले, “अभी तो ली अंगड़ाई है, आगे और लड़ाई है। धर्मेंद्र प्रधान तो गए, अब प्रधानमंत्री नरेंद्र मोदी की बारी है.”
धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याला विद्यार्थी आंदोलनाचा मोठा विजय मानत विरोधकांकडून सातत्याने प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. कन्हैया कुमार यांच्या वक्तव्यानंतरही राजकीय वातावरण तापले असून, त्यांच्या विधानावर सत्ताधारी आणि विरोधकांकडून प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे.
देशभरातील विद्यार्थी आंदोलन, शिक्षण व्यवस्थेतील सुधारणा आणि सरकारच्या भूमिकेवरून सुरू असलेला राजकीय संघर्ष आता आणखी तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.