बँक खात्याचा सायबर गुन्ह्यासाठी वापर
पिंपरी, दि. 26 (प्रतिनिधी) – बँक खात्याचा वापर संघटित सायबर गुन्हेगारीच्या आर्थिक व्यवहारांसाठी करण्यात आला. हा प्रकार 7 डिसेंबर 2025 ते 4 फेब्रुवारी 2026 या कालावधीत बँक ऑफ महाराष्ट्र, देहूगाव शाखेत घडला.
पियुष उमेश जामदार (वय 19, रा. गणेश चौक, तळवडे गाव, ता. हवेली, जि. पुणे) याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीस शिपाई युवराज भगवान माने (वय 35) यांनी तक्रार दिली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने स्वतःच्या बँक ऑफ महाराष्ट्रच्या खात्याचा वापर आपल्या साथीदारांशी संगनमत करून सायबर फसवणुकीचे पैसे घेण्यासाठी करून दिला. या खात्यात एक लाख 22 हजार 106 रुपये जमा झाले असून त्यातील 60,000 रुपये एटीएमद्वारे काढल्याचे तपासात उघड झाले आहे. पुढील तपास देहुरोड पोलीस करत आहेत.