सायबर फसवणुकीसाठी तरुणाने बँक खाते दिले भाड्याने
पिंपरी, दि. २७ (प्रतिनिधी) – स्वतःचे बँक खाते आरोपी साथीदारांच्या संगनमताने सायबर फसवणुकीच्या आर्थिक व्यवहारांसाठी वापरण्यास भाड्याने दिले. ही घटना महाळुंगे चाकण तळेगाव रोड येथे ६ नोव्हेंबर २०२५ ते १८ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत घडली आहे.
अजय नेताजी सुतार (वय २५, रा. महाळुंगे गाव, ता. खेड, जि. पुणे) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस शिपाई समीर शब्बीर महात (वय २२) यांनी तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने बँक ऑफ बडोदाच्या महाळुंगे शाखेत स्वतःचे खाते उघडले. आर्थिक फायद्यासाठी हे खाते सायबर गुन्हेगारांना वापरण्यास भाड्याने दिले. या खात्यावर भारतातील ७ नागरिकांचे ६२,००० रुपये आल्याचे निष्पन्न झाले. उत्तर महाळुंगे पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.