चिमुकलीवर लैंगिक अत्याचार; ज्येष्ठाला अटक
पिंपरी, दि. २८ (प्रतिनिधी) – १० वर्षांच्या चिमुकलीवर वारंवार जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला. ही घटना मे २०२६ ते २७ जुलै २०२६ दरम्यान घडली.
याप्रकरणी ६१ वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकाला पोलिसांनी अटक केली आहे. पीडित मुलीच्या ३० वर्षीय आई याबाबत वाकड पोलिसांत फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादीच्या १० वर्षांच्या मुलीचे तोंड दाबून स्वतःच्या घरात नेऊन अत्याचार केले. तसेच ४ वर्षांच्या दुसऱ्या लहान मुलीलाही बळजबरीने घरात नेले. माहिती मिळताच पोलिसांनी बालकांचे संरक्षण आणि ॲट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला. पुढील तपास वाकड पोलीस करीत आहेत.