तडीपार गुंडास कोयत्यासह अटक
पिंपरी, दि. २८ (प्रतिनिधी) – तडीपारी आदेशाचा भंग करून शहरात आलेल्या गुंडास पोलिसांनी कोयत्यासह अटळक केली. ही कारवाई कासारवाडीतील हिराबाई झोपडपट्टी रस्त्यावर २६ जुलैच्या रात्री केली.
अरशद हनिफ सय्यद (वय २६, रा. जामा मशिदीजवळ, कासारवाडी) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पोलीस शिपाई आकाश श्रावण सोनवणे (वय ३४) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने तडीपारीच्या आदेशाचे उल्लंघन करून शहरात प्रवेश केला. तसेच पोलिसांच्या शस्त्रबंदी आदेशाचा भंग करून १०० रुपये किमतीचा कोयता बाळगताना मिळून आला. पुढील तपास दापोडी पोलीस करीत आहे.