वन्यजीव रक्षक मावळ संस्था मार्फत कान्हे येथे एका अजगराला जीवदान

आज कान्हे फाटा येथे श्री आनंद हरिभाऊ  टपाले यांच्या घरामागे अचानक साप दिसून आल्याने एकच धावपळ झाली. सदर ठिकाणी वन्यजीव रक्षक टीम चे प्रमोद ओव्हाळ, जिगर सोलंकी, अजित नाणेकर , जयेश ओव्हाळ यांनी पडताळणी केली असता अजगर जातीचा साप असल्याचे स्पष्ठ झाले . तत्काळ त्याला रेस्क्यू करून प्रार्थमिक तपासणी केली . आजूबाजूला उपस्थित असलेल्या लोकांना त्या सापाविषयी जनजागृती करून सुमारे ४ फूट लांबीच्या अजगराला वनविभागच्या मार्गदर्शना खाली त्याच्या अधिवासात सोडण्यात आले.

मुंबई_पुणे महामार्गालगतच्या गजबजलेल्या कान्हे मावळ भागात पहिल्यांदाच एक ‘भारतीय अजगर’ आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. पावसाळ्यात भक्ष, पाणी आणि निवाऱ्याच्या शोधात साप किंवा इतर वन्यजीव मानवी वस्तीकडे धाव घेतात, म्हणूनच नागरिकांनी घराशेजारील परिसरात अडगळ होऊ न देण्याची काळजी घ्यावी. भारतीय अजगर हा पूर्णपणे बिनविषारी आणि अत्यंत संथ असतो. तो माणसाला चावण्याची शक्यता फार कमी असते आणि शिकार करताना तो विषाचा वापर न करता भक्षाला शरीराने घट्ट वेढून, त्याची घुसमट करून मारतो. पांढरट-तपकिरी शरीरावर गडद तपकिरी डाग असलेला हा साप आकाराने मोठा, लांबसर आणि जाडसर असतो, जो अनेकदा १० ते १५ फुटांपर्यंत वाढू शकतो.
कोणताही साप चावल्यास प्रथम घाबरून न जाता रुग्णाला शांत ठेवावे. चावलेली जागा कधीही कापू नये, तिथे एकदम घट्ट बांधू नये किंवा विष चोखून शोषण्याचा प्रयत्न करू नये. कोणत्याही चुकीच्या घरगुती उपायांमध्ये वेळ वाया न घालवता रुग्णाला तत्काळ जवळच्या सुसज्ज रुग्णालयात पोहोचवावे, जिथे ‘अँटी-स्नेक व्हेनम’ (ASV) उपलब्ध असेल. उपचाराच्या मदतीसाठी सापाची ओळख सांगता आली तर उत्तम, पण त्याला शोधण्यात वेळ वाया घालवू नये. परिसरात साप किंवा इतर वन्यजीव दिसून आल्यास नागरिकांनी घाबरून न जाता तातडीने स्थानिक सर्पमित्रांशी किंवा वन विभागाशी संपर्क साधावा.
– प्रमोद ओव्हाळ
उपाध्यक्ष, वन्यजीव रक्षक मावळ संस्था

कोणता ही वन्यप्राणी जखमी अवस्थेत अधळ्यास जवळ पास च्या प्राणीमित्र ला किंवा वनविभागला संपर्क (१९२६) करावा असे आव्हान वन्यजीव रक्षक मावळ संस्थे चे संस्थापक निलेश गराडे ९८२२५५५००४ आणि अध्यक्ष अनिल आंद्रे यांनी लोकांना केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *