दारू आणि गुटख्याची विक्री करणार्यावर कारवाई
पिंपरी, दि. 26 (प्रतिनिधी) – बेकायदेशीरपणे देशी दारू आणि सुगंधी तंबाखू व गुटखा बाळगणार्या एकाला पोलिसांनी रंगेहात पकडले. ही कारवाई 25 जुलै रोजी सायंकाळी 4.45 वाजण्याच्या सुमारास जय गणेश पान शॉप व विश्व विलास बिर्याणी हाऊसजवळ, भोसरी येथे करण्यात आली.
विश्वभरनाथ फौजदार यादव (वय 45, रा. डोळस वस्ती, भोसरी; मूळ रा. सावरसुर, ता. निलंगा, जि. लातूर) याला अटक करण्यात आली आहे. पोलीस हवालदार अशोक आबासाहेब माने यांनी फिर्याद दिली आहे. पोेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा स्वतःच्या फायद्यासाठी विनापरवाना 18 हजार 796 रुपये किमतीची देशी दारू विक्री करताना आढळून आला. तसेच अन्न व औषध प्रशासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा व सुगंधी तंबाखूजन्य पदार्थ बाळगल्याचे निष्पन्न झाले. पुढील तपास भोसरी पोलीस करत आहेत.