पिंपरी, दि. १४ (प्रतिनिधी) – फुटपाथवर पैशांवर ‘चिमणी पाखरू’ नावाचा जुगार खेळणाऱ्या आणि खेळवून घेणाऱ्या दोन महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही कारवाई डांगे चौकात १३ जून रोजी सकाळी साडेदहा वाजता करण्यात आली.
रेशमा मिथुन आटोटे (वय ३५, रा. बालाजीनगर झोपडपट्टी, भोसरी) व सखुबाई दशरथ शिंदे (वय ३२, रा. थेरगाव फाटा) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. महिला पोलीस शिपाई धनश्री अरुण भंडारकर यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिला स्वतःच्या फायद्यासाठी लोकांकडून पैसे लावून जुगार खेळत व खेळवत असताना ६५० रुपयांच्या मुद्देमालासह रंगेहात मिळून आल्या. पुढील तपास वाकड पोलीस करीत आहेत.
‘चिमणी पाखरू’ जुगार खेळणाऱ्या दोन महिलांवर कारवाई
