पिंपरी, दि. ३० (प्रतिनिधी) – बेकायदेशीरपणे अंमली पदार्थाची विक्री करणाऱ्या एका महिलेला पोलिसांनी रंगेहात अटक केली. ही कारवाई २९ जून रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास बावधन येथील जाधववस्तीत रायन स्कूलसमोरील रस्त्यावर केली.
एका महिला आरोपीला अंमली पदार्थ विरोधी कायद्यानुसार अटक केली आहे. पोलीस हवादार अरुण पांडुरंग नरळे यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिला संबंधित परिसरात गांजा विकण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती. पोलिसांनी सापळा रचून तिला ताब्यात घेतले, तिच्या ताब्यातून १७ हजार रुपये किमतीचा ३४० ग्रॅम वजनाचा गांजा हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे. पुढील तपास बावधन पोलीस करीत आहे.
गांजा विक्री करणाऱ्या महिलेवर कारवाई
