पिंपरी, दि. १७ (प्रतिनिधी) – वाकड येथील म्हातोबानगर झोपडपट्टी परिसरात गांजा विक्री करण्यासाठी आलेल्या एका महिलेवर गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने गुन्हा दाखल केला. ही कारवाई मंगळवारी (दि. १६ जून) रोजी दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास केली.
राधीका मुकेश यादव (वय २२, रा. म्हातोबानगर झोपडपट्टी, वाकड) या महिलेविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अंमली पदार्थ विरोधी पथकातील पोलीस शिपाई गोविंद देवराव डोके (वय ३३) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, म्हातोबानगर येथील गीता यादव यांच्या घरासमोरील सार्वजनिक रस्त्यावर महिला आरोपी गांजा विक्री करत असल्याचे दिसून आले. तिच्या ताब्यातून आठ हजार ७००/- रुपये किमतीचा १६४ ग्रॅम वजनाचा गांजा आणि रोख रक्कम जप्त केली. पुढील तपास वाकड पोलीस करीत आहेत.
गांजा विक्री करणाऱ्या महिलेवर कारवाई
