Skip to content
-
Subscribe to our newsletter & never miss our best posts. Subscribe Now!
  • https://www.facebook.com/
  • https://twitter.com/
  • https://t.me/
  • https://www.instagram.com/
  • https://youtube.com/
Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ

Company

  • About Us
  • Contact
  • Advertise
  • Reprints & Licensing
  • Help Center
  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
Subscribe
Close

Search

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
  • https://www.facebook.com/
  • https://twitter.com/
  • https://t.me/
  • https://www.instagram.com/
  • https://youtube.com/
पिंपरी-चिंचवड

राजकीय हायव्होल्टेज ड्राम्यानंतर अखेर जॉगर्स पार्कसमोरील ‘ते’ अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त;

By Team News Beez
May 20, 2026 2 Min Read
0

माजी महापौर मंगला कदम यांना धक्‍का; आगामी भूमिकेकडे राजकीय नेत्‍यांचे लक्ष
​पिंपरी-चिंचवड :
गेल्या काही दिवसांपासून पिंपरी-चिंचवडच्या राजकीय वर्तुळात प्रचंड वादळ उठवणाऱ्या प्रभाग क्रमांक ११ मधील जॉगर्स पार्क उद्यान परिसरातील अनधिकृत बांधकामावर अखेर महापालिकेच्या ‘फ’ क्षेत्रीय कार्यालयाने आज हातोडा चालवला. तब्बल ६ जेसीबीच्या साहाय्याने महापालिकेने सुमारे १५०० चौरस मीटर (१६ हजार चौरस फुटांपेक्षा जास्त) क्षेत्र अतिक्रमणमुक्त केले. मात्र, ज्या बांधकामावरून शहरात मोठे ‘राजकीय नाट्य’ रंगले होते, तेच पाडल्याने आता उलट-सुलट चर्चांना उधाण आले आहे.
​वादग्रस्त व्हिडिओ आणि राजकीय खळबळ!
​या अनधिकृत बांधकामावरून भाजप नगरसेविका योगिता नागरगोजे आणि राष्ट्रवादीच्या माजी महापौर मंगला कदम यांच्यात सोशल मीडियावर जोरदार शाब्दिक युद्ध रंगले होते. त्यातच या वादादरम्यानचा माजी महापौर मंगला कदम यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. या व्हिडिओमध्ये कदम थेट भाजप आमदार महेश लांडगे यांना खडे बोल सुनावताना दिसत आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, “माजी आमदार विलास लांडे यांना पाडण्यासाठी मी तुमचे काम केले होते,” अशी उघड कबुली देताना मंगला कदम या व्हिडिओत दिसत आहेत. या एका विधानामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती.
​ज्या बांधकामावरून एवढा मोठा वाद, आरोप-प्रत्यारोप आणि अंतर्गत राजकीय साट्यालोट्याचा उलगडा झाला, तेच अनधिकृत बांधकाम महापालिकेने जमीनदोस्त केल्यामुळे आता “माजी महापौर मंगला कदम पुढे काय भूमिका घेतात?” याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.
​प्रशासनाचा मोठा फौजफाटा तैनात
​आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या निर्देशानुसार आणि अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्या नियंत्रणाखाली ही कारवाई अत्यंत कडक बंदोबस्तात पार पडली. ‘फ’, ‘अ’ आणि ‘क’ क्षेत्रीय कार्यालयांचे एकूण ५७ महाराष्ट्र सुरक्षा दलाचे (MSF) जवान, १७ अतिक्रमण पोलीस, ६ जेसीबी मशीन आणि मोठ्या संख्येने मजूर या कारवाईसाठी तैनात होते.
​कारवाईच्या वेळी उप आयुक्त अतुल पाटील, प्रशासन अधिकारी महादेव बोरे, उप अभियंता किरण सगर, कनिष्ठ अभियंता प्रताप मोरे, वैभव विटकरे तसेच बीट निरीक्षक साक्षी जांभुळकर, निकिता भोईटे, विकास वारभुवन आणि रूपक शिनगारे उपस्थित होते.

​अतिक्रमणांविरोधात तडजोड नाही: आयुक्त
​”शहरातील सार्वजनिक जागा, उद्याने आणि नागरिकांसाठी राखीव असलेली मोकळी मैदाने अतिक्रमणमुक्त ठेवणे ही महापालिकेची प्राथमिक जबाबदारी आहे. अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणांविरोधात कोणतीही राजकीय किंवा अन्य तडजोड केली जाणार नाही. शहराच्या नियोजनबद्ध विकासासाठी अशा कारवाया यापुढेही सातत्याने सुरूच राहतील.”
— डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका

Tags:

Former Mayor Mangala Kadam
Author

Team News Beez

Follow Me
Other Articles
Previous

पिंपरीत वेश्या व्यवसायासाठी खुणावणाऱ्या महिलेवर गुन्हा

Next

चासकमान डावा कालवा परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

No Comment! Be the first one.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECENT POSTS

  • शतक महोत्सवी मराठी साहित्य संमेलनासाठी शासनाकडून भरीव निधी मराठीच्या जागतिक प्रचारासाठी राज्य कटिबद्ध; उदय सामंत यांची घोषणा
  • अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी आरोपीला १० वर्षांची सक्तमजुरी विशेष पोक्सो न्यायालयाचा निर्णय; २५ हजारांचा दंड, निगडी पोलीसांच्या तपासाला यश
  • उद्या निगडीत वाहतुकीत बदल भक्ती-शक्ती परिसरात गर्दीची शक्यता; वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन
  • कॅप्टन अमोल महाडिक यांचा सहकाऱ्यांसह काँग्रेस पक्षात प्रवेश. आरक्षणाच्या मुद्द्यावरून जाती जातीत भांडणे पेटवण्याचा सरकारचा प्रयत्न
  • Pimpri-Chinchwad-पिंपरी चिंचवड लोडशेडिंगमुक्त करण्यासाठी आमदार शंकर जगताप यांचा “मास्टर प्लॅन”

CATEGORIES

  • Uncategorized (478)
  • क्राईम (264)
  • देश (42)
  • पिंपरी-चिंचवड (908)
  • पुणे (141)
  • मनोरंजन (1)
  • राजकीय (95)
  • राज्य (189)
  • हेल्थ (3)

Latest News

  • शतक महोत्सवी मराठी साहित्य संमेलनासाठी शासनाकडून भरीव निधी मराठीच्या जागतिक प्रचारासाठी राज्य कटिबद्ध; उदय सामंत यांची घोषणा
  • अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी आरोपीला १० वर्षांची सक्तमजुरी विशेष पोक्सो न्यायालयाचा निर्णय; २५ हजारांचा दंड, निगडी पोलीसांच्या तपासाला यश
  • उद्या निगडीत वाहतुकीत बदल भक्ती-शक्ती परिसरात गर्दीची शक्यता; वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन
July 31, 2026

शतक महोत्सवी मराठी साहित्य संमेलनासाठी शासनाकडून भरीव निधी मराठीच्या जागतिक प्रचारासाठी राज्य कटिबद्ध; उदय सामंत यांची घोषणा

Sumedh Chapalgaonkar

पुणे : शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या भव्य आयोजनासाठी राज्य शासनाकडून भरीव निधी उपलब्ध...

Read More
July 31, 2026
July 31, 2026

अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी आरोपीला १० वर्षांची सक्तमजुरी विशेष पोक्सो न्यायालयाचा निर्णय; २५ हजारांचा दंड, निगडी पोलीसांच्या तपासाला यश

Sumedh Chapalgaonkar

पिंपरी, दि. ३१ (प्रतिनिधी) – अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचाराच्या प्रयत्नप्रकरणी पिंपरी-चिंचवड येथील विशेष पोक्सो न्यायालयाने...

Read More
July 31, 2026
July 31, 2026

उद्या निगडीत वाहतुकीत बदल भक्ती-शक्ती परिसरात गर्दीची शक्यता; वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

Sumedh Chapalgaonkar

पिंपरी-चिंचवड ः साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त शनिवारी (१ ऑगस्ट) रोजी निगडीतील भक्ती-शक्ती...

Read More
July 31, 2026
July 31, 2026

कॅप्टन अमोल महाडिक यांचा सहकाऱ्यांसह काँग्रेस पक्षात प्रवेश. आरक्षणाच्या मुद्द्यावरून जाती जातीत भांडणे पेटवण्याचा सरकारचा प्रयत्न

Sumedh Chapalgaonkar

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांचे भाचे कॅप्टन अमोल महाडिक यांनी आज...

Read More
July 31, 2026
July 31, 2026

Pimpri-Chinchwad-पिंपरी चिंचवड लोडशेडिंगमुक्त करण्यासाठी आमदार शंकर जगताप यांचा “मास्टर प्लॅन”

Sumedh Chapalgaonkar

– महावितरणच्या ‘प्रकाश भवन’ कार्यालयामध्ये शहरातील वीज प्रश्नांवर महत्वपूर्ण बैठक – पिंपरी-चिंचवडसह राजगुरुनगर, लोणावळ्यासाठी नवीन...

Read More
July 31, 2026
July 30, 2026

सराईत वाहन चोरट्यांना अटक; पाच वाहने जप्त

Sumedh Chapalgaonkar

चिखली पोलिसांनी दोन सराईत वाहन चोरांना अटक केली. त्यांच्याकडून चार दुचाकी आणि एक रिक्षा अशी...

Read More
July 30, 2026
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Jul    
Copyright 2026 — Newsbeez. All rights reserved. Blogsy WordPress Theme