‘अयोध्येत भाजपला जनतेने नाकारल्याचा राग रामावर काढताय का?’; राम मंदिर देणगी चोरीप्रकरणावर राज ठाकरे संतप्त

मुंबई : अयोध्या राम मंदिरातील कथित देणगी चोरी प्रकरणावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. “अयोध्येत भाजपला जनतेने नाकारले म्हणून प्रभू रामांना पुन्हा वनवासात ढकलले जात आहे का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

राम मंदिरातील कथित आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपांची सखोल आणि निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी करत राज ठाकरे यांनी या प्रकरणावर संताप व्यक्त केला. त्यांच्या या वक्तव्यानंतर राज्यासह देशाच्या राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *