पार्किंगच्या कारणावरून मारहाण; एकाचा अंगठा फ्रॅक्चर

पिंपरी, दि. १६ (प्रतिनिधी) – पार्किंगच्या कारणावरून एका तरुणाला आणि त्याच्या मावशीला बेदम मारहाण करत अंगठा फ्रॅक्चर केला. ही घटना पिंपळे गुरव येथील वैभवलक्ष्मी अपार्टमेंटमध्ये रविवारी (दि. १४ जून) रोजी दुपारी साडेचार वाजताच्‍या सुमारास घडली.
​आशा राजुकटराज (वय ५३, रा. वैभवलक्ष्मी अपार्टमेंट, पिंपळे गुरव) यांनी सोमवारी (दि. १५ जून) रोजी सांगवी पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. शिवराज वाघमारे (वय ५६), त्याची पत्नी पुष्पा शिवराज वाघमारे (वय ५४) आणि मुलगा महेश शिवराज वाघमारे (वय ३५, सर्व रा. लक्ष्मी नगर, पिंपळे गुरव) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांचा भाचा आशिष यांना आरोपींनी पार्किंगच्या कारणावरून शिवीगाळ व धमकी दिली. तसेच आशिषचा अंगठा मुरगळून तो फ्रॅक्चर केला. सांगवी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *