भरधाव टेम्पोच्या धडकेने दुचाकीस्वार गंभीर जखमी

​पिंपरी, दि. २० (प्रतिनिधी) – पाठीमागून आलेल्या एका भरधाव टाटा टेम्पोने दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीवरून खाली पडल्याने एका व्यक्तीच्या पाठीचा मणका फॅक्चर होऊन ते गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना मंगळवारी (दि. १२ मे) रात्री आठच्या सुमारास मोशीतील भारतमाता चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील संतोष बारणे यांच्या बंगल्याजवळ घडली.
​याप्रकरणी संतोष नामदेव बोराटे (वय ४९, रा. देहुरस्ता, भाऊसाहेब निवास, मोशी, पुणे) यांनी याप्रकरणी मंगळवारी (दि. १९ मे) रोजी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी टाटा टेम्पो (क्र. एम.एच. १४ केए ९३३५) या टाटा टेम्‍पो वरील चालक उमेश बाळासाहेब गाडे (वय ३९, रा. लक्ष्‍मी चौक, मोशी) यांच्‍या विरोधात गुन्‍हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी संतोष बोराटे यांचे मोठे भाऊ हे लक्ष्मी चौक, मोशी येथून कामाच्या निमित्ताने त्यांच्या (एमएच १४ एच ए ११०९) या दुचाकी वरून जात होते. ते संतोष बारणे यांच्या बंगल्याच्या पुढे आले असता, पाठीमागून आलेल्या एका टेम्पो चालक उमेश गाडे याने आपल्या ताब्यातील वाहन भरधाव व निष्काळजीपणे चालवून त्यांच्या स्कुटीला पाठीमागून जोरात धडक दिली. या अपघातात फिर्यादीचे भाऊ गंभीर जखमी झाले. ​या गुन्ह्याचा पुढील तपास एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार ठोंबरे करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *