त्रिवेणी नगरमध्ये ट्रेलरच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी

पिंपरी, दि. ५ (प्रतिनिधी) – भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने दुचाकीला पाठीमागून धडक दिल्याने एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना सोमवारी (दि. ४ मे) पहाटे २:१० वाजताच्या सुमारास निगडी परिसरातील त्रिवेणी नगर चौकात घडली.
महेश लालासाहेब बाबर (वय ३८, रा. तळवडे गणेश नगर, तळवडे) यांनी सोमवारी (दि. ४ मे) रोजी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. टाटा ट्रक (एमएच ०४ एलक्यु ९७१५) वरील अनोळखी चालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांच्या मोपेडवरून घरी जात असताना त्रिवेणी नगर चौकातील हनुमान मंदिराजवळ मागून येणाऱ्या ट्रकने त्यांच्या गाडीला जोरात धडक दिली. या अपघातात फिर्यादीच्या उजव्या पायाचा पंजा आणि टाचेला गंभीर दुखापत झाली आहे. अपघात झाल्यानंतर चालक ट्रक सोडून घटनास्थळावरून पळून गेला. निगडी पोलीस तपास याबाबत अधिक करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *