पिंपरी, दि. १५ (प्रतिनिधी) – एका चायनीज सेंटरमध्ये बेकायदेशीरपणे ग्राहकांना दारू पिण्यासाठी जागा उपलब्ध करून दिल्याप्रकरणी चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई कुरूळी येथे शनिवारी (दि. १३ जून) रोजी रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास करण्यात आली.
पोलीस शिपाई राजेश वसंतगिरी यांनी दक्षिण म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी संतोष नवनाथ खडप (वय २५, रा. कुरुळी, मूळ- लातूर) या आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुरुळी येथील डिके चौकातील ‘जय तुळजाभवानी चायनीज सेंटर’ येथे आरोपीने स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी ग्राहकांना दारू पिण्याची बेकायदेशीर मुभा दिली होती. पोलिसांनी शनिवारी रात्री तिथे छापा टाकून ही कारवाई केली. पुढील तपास दक्षिण म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस करत आहेत.
कुरुळीतील हॉटेल चालकावर गुन्हा
