पिंपरी, दि. १४ (प्रतिनिधी) – पाळीव कुत्रा सुटून शेजाऱ्यांच्या घराकडे गेल्याच्या क्षुल्लक कारणावरून एका सेवानिवृत्त व्यक्तीला लाकडी दांडक्याने मारहाण केली. ही घटना बोपखेल येथे १२ जून रोजी सायंकाळी ६ वाजता स्कायलाईट सोसायटीच्या पार्किंगमध्ये घडली.
संतोष गिरी (वय ३०, रा. गणेशनगर, बोपखेल) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. प्रमोदकुमार रामकरण तिवारी (वय ५०, रा. गणेशनगर, बोपखेल) यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या हातातील पाळीव कुत्रा सुटून आरोपीच्या घराजवळ गेल्याने चिडलेल्या आरोपीने फिर्यादीला शिवीगाळ केली. तसेच डोक्यात, पायावर व छातीवर लाकडी दांडक्याने मारहाण केली. पुढील तपास दिघी पोलीस करीत आहेत.
पाळीव कुत्र्याच्या वादातून एकाला दांडक्याने मारहाण
