Skip to content
-
Subscribe to our newsletter & never miss our best posts. Subscribe Now!
  • https://www.facebook.com/
  • https://twitter.com/
  • https://t.me/
  • https://www.instagram.com/
  • https://youtube.com/
Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ

Company

  • About Us
  • Contact
  • Advertise
  • Reprints & Licensing
  • Help Center
  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
Subscribe
Close

Search

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
  • https://www.facebook.com/
  • https://twitter.com/
  • https://t.me/
  • https://www.instagram.com/
  • https://youtube.com/
पिंपरी-चिंचवड

सहा तासांत घरफोडीचा छडा; अल्पवयीन मुलासह तिघे ताब्यात काळेवाडी पोलिसांची कारवाई; एक लाख आठ हजारांचा मुद्देमाल जप्त

By Sumedh Chapalgaonkar
July 28, 2026 2 Min Read
0

पिंपरी : काळेवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत मध्यरात्री बंद घरांचे कुलूप तोडून घरफोडी करणाऱ्या सराईत चोरट्यांचा काळेवाडी पोलिसांनी अवघ्या सहा तासांत छडा लावला. या कारवाईत दोन सराईत गुन्हेगारांसह एका विधीसंघर्षित बालकाला ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याकडून चोरीतील एक लाख आठ हजार ९७० रुपयांचा मुद्देमाल तसेच एक गावठी पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.

कैलास अशोक खलसे (वय ४०, रा. भारतनगर, पिंपरी), शुभम शांताराम दुबे (वय २७, रा. थेरगाव), अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. त्यांच्यासह एका विधीसंघर्षित बालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले. काळेवाडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र बहिरट यांनी दिलेल्या माहितीनुसार, काळेवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत रविवारी (दि. २६ जुलै) रात्री दीड ते पहाटे तीन वाजण्याच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी बंद घरांचे कडी-कोयंडे तोडून घरात प्रवेश केला. घरातील मौल्यवान वस्तू आणि इतर साहित्य चोरून नेले. याप्रकरणी काळेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. काळेवाडी पोलिसांच्या तपास पथकाने गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त खबऱ्यांच्या मदतीने संशयितांचा माग काढला. त्यानुसार कैलास खलसे आणि शुभम दुबे आणि एका विधीसंघर्षित बालकाचा गुन्ह्यात सहभाग निष्पन्न झाला. तिघांना ताब्यात घेतल्यानंतर चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्याकडून चोरीतील संपूर्ण मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पोलिस उपायुक्त प्रदीप जाधव, सहायक आयुक्त सुनील कुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र बहिरट, निरीक्षक (गुन्हे) सुरेंद्र धुमाळे, तपास पथकातील सहायक निरीक्षक वैभव गुरव, पोलिस अंमलदार प्रमोद कदम, अतिक शेख, भारत पारधी, अशोक जायभाये, रमेश ब्राम्हण, अजय फल्ले, भास्कर भारती, गणेश जाधव, मंगेश लोखंडे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

एक पिस्तूल, दोन काडतुसे जप्त

तपासादरम्यान संशयितांकडून एक गावठी पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसेही हस्तगत करण्यात आली. दोन्ही अटक संशयितांविरुद्ध यापूर्वीही मालमत्तेविरुद्धचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Author

Sumedh Chapalgaonkar

Follow Me
Other Articles
Previous

महिलांवरील गुन्ह्यांच्या तपासासाठी तंत्रज्ञानाधारित पोलिसिंगवर राष्ट्रीय कार्यशाळा सायबर गुन्ह्यांपासून संरक्षण, संवेदनशील तपास आणि डिजिटल फॉरेन्सिकवर अधिकाऱ्यांना मार्गदर्शन

Next

मतदार यादीत नाव हवे?; ८ ऑगस्टपर्यंत गणना अर्ज भरण्याचे महापालिकेचे आवाहन पिंपरी, चिंचवड आणि भोसरी मतदारसंघातील पात्र नागरिकांनी बीएलओकडे अर्ज जमा करावेत; १७ ऑगस्टला प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होणार

No Comment! Be the first one.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECENT POSTS

  • रस्त्यावर पार्क केलेली दुचाकी चोरीला
  • चिमुकलीवर लैंगिक अत्याचार; ज्‍येष्‍ठाला अटक
  • तडीपार गुंडास कोयत्‍यासह अटक
  • गांजाची विक्री करणाऱ्यावर गुन्‍हा दाखल
  • बँक खात्याचा वापर करून पैसे उकळले

CATEGORIES

  • Uncategorized (476)
  • क्राईम (261)
  • देश (42)
  • पिंपरी-चिंचवड (897)
  • पुणे (137)
  • मनोरंजन (1)
  • राजकीय (94)
  • राज्य (189)
  • हेल्थ (3)

Latest News

  • रस्त्यावर पार्क केलेली दुचाकी चोरीला
  • चिमुकलीवर लैंगिक अत्याचार; ज्‍येष्‍ठाला अटक
  • तडीपार गुंडास कोयत्‍यासह अटक
July 28, 2026

रस्त्यावर पार्क केलेली दुचाकी चोरीला

Sumedh Chapalgaonkar

पिंपरी, दि. २८ (प्रतिनिधी) – रस्त्यावर पार्क केलेली दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेली. ही घटना...

Read More
July 28, 2026
July 28, 2026

चिमुकलीवर लैंगिक अत्याचार; ज्‍येष्‍ठाला अटक

Sumedh Chapalgaonkar

पिंपरी, दि. २८ (प्रतिनिधी) – १० वर्षांच्या चिमुकलीवर वारंवार जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला. ही घटना...

Read More
July 28, 2026
July 28, 2026

तडीपार गुंडास कोयत्‍यासह अटक

Sumedh Chapalgaonkar

पिंपरी, दि. २८ (प्रतिनिधी) – तडीपारी आदेशाचा भंग करून शहरात आलेल्‍या गुंडास पोलिसांनी कोयत्‍यासह अटळक...

Read More
July 28, 2026
July 28, 2026

गांजाची विक्री करणाऱ्यावर गुन्‍हा दाखल

Sumedh Chapalgaonkar

पिंपरी, दि. २८ (प्रतिनिधी) – बेकायदेशीरपणे गांजाची विक्री करणाऱ्या तरुणावर गुन्‍हा दाखल केला. ही कारवाई...

Read More
July 28, 2026
July 28, 2026

बँक खात्याचा वापर करून पैसे उकळले

Sumedh Chapalgaonkar

पिंपरी, दि. २८ (प्रतिनिधी) – सायबर फसवणुकीतील रक्कम स्वतःच्या बँक खात्यात मागवून ती एटीएमद्वारे काढून...

Read More
July 28, 2026
July 28, 2026

सायबर फसवणुकीचे पैसे एटीएममधून काढले

Sumedh Chapalgaonkar

पिंपरी, दि. २८ (प्रतिनिधी) – सायबर फसवणुकीतील रक्कम एटीएमद्वारे काढून फसवणूक केली. ही घटना १८...

Read More
July 28, 2026
July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
Copyright 2026 — Newsbeez. All rights reserved. Blogsy WordPress Theme