पिंपरी, दि. 29 (pimpri chinchwad crime) – तळेगाव दाभाडे येथील जुन्या पुणे-मुंबई हायवेवर वेश्या व्यवसायाच्या उद्देशाने सार्वजनिक ठिकाणी अश्लील वर्तन करणार्या एका महिलेवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई मंगळवारी (दि. 28 एपिल) रोजी दुपारी तीन वाजताच्या सुमारास करण्यात आली.
याप्रकरणी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षातील पोलीस हवालदार उदयकुमार बाळासाहेब भोसले यांनी मंगळवारी (दि. 28 एप्रिल) रोजी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सीआरपीएफ गेट नंबर 3 समोरील वडाच्या झाडाखाली महिला आरोपी लैंगिक हावभाव करून आणि शब्द उच्चारून येणार्या-जाणार्या लोकांना अडथळा निर्माण करत होती.
सार्वजनिक सभ्यतेचा भंग केल्याप्रकरणी पीटा कायद्यांतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तळेगाव दाभाडे पोलीस याप्रकरणी तपास करीत आहेत.
