Skip to content
-
Subscribe to our newsletter & never miss our best posts. Subscribe Now!
  • https://www.facebook.com/
  • https://twitter.com/
  • https://t.me/
  • https://www.instagram.com/
  • https://youtube.com/
Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ

Company

  • About Us
  • Contact
  • Advertise
  • Reprints & Licensing
  • Help Center
  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
Subscribe
Close

Search

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
  • https://www.facebook.com/
  • https://twitter.com/
  • https://t.me/
  • https://www.instagram.com/
  • https://youtube.com/
Uncategorized

राखीव प्रवेशासाठी जात वैधता प्रमाणपत्र सक्तीचे; नवे निर्देश-शंकर जगताप

By Team News Beez
July 9, 2026 2 Min Read
0

– पिंपरी-चिंचवड ते नागपूर बोगस आदिवासी दाखला घोटाळ्याचा पर्दाफाश
– बोगस जात वैधता प्रमाणपत्र सादर करून ३२ विद्यार्थ्यांचे प्रवेश
– २ प्राध्यापकांसह ११ जणांवर गुन्हा, ९ जणांना अटक

पिंपरी, ९ जुलै : राज्यातील व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेत अत्यंत धक्कादायक आणि गंभीर प्रकार उघडकीस आला असून, अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गाच्या राखीव जागा बोगस कागदपत्रांच्या आधारे लाटणाऱ्या ३२ विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द करण्यात आले आहेत  या बोगस जात वैधता प्रमाणपत्र घोटाळ्यामागे महाविद्यालयीन प्राध्यापक आणि दलालांचे मोठे रॅकेट कार्यरत असल्याचे समोर आले असून, याप्रकरणी नागपूर ग्रामीणमधील पाचगाव पोलीस ठाण्यात २ सहाय्यक प्राध्यापकांसह एकूण ११ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईअंतर्गत आतापर्यंत ९ आरोपींना अटक करण्यात आली असून, उर्वरित दोन फरार आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत. चिंचवड विधानसभेचे आमदार शंकर जगताप यांनी गुरुवारी विधिमंडळ अधिवेशनात विचारण्यात आलेल्या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी ही माहिती दिली.

नागपूर येथील गोविंदराव वंजारी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ऑफ टेक्नॉलॉजी (हुडकेश्वर रोड) येथे कार्यरत असलेल्या सहाय्यक प्राध्यापकांच्या मदतीने दलालांमार्फत अनुसूचित जमातीची बोगस जात वैधता प्रमाणपत्रे तयार करण्यात आली होती. या बनावट प्रमाणपत्रांच्या आधारे विद्यार्थ्यांनी नागपूरच्या संबंधित कॉलेजमध्ये आणि पुणे येथील पिंपरी चिंचवडमधील रावेत कॉलेजमध्ये व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी राखीव जागांवर प्रवेश मिळवले . अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती, नागपूर यांच्याकडे जेव्हा ही कागदपत्रे पडताळणीसाठी आली, तेव्हा हा सर्व बोगसगिरीचा प्रकार उघडकीस आला . त्यानंतर ‘आयुक्त, संशोधन व प्रशिक्षण संस्था (TRTI), पुणे’ यांनी तात्काळ राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष (MH-CET), मुंबई यांना पत्र लिहून संबंधित दोषी विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द करण्याची शिफारस केली . त्यानुसार सीईटी सेलने या विद्यार्थ्यांचे व्यावसायिक अभ्यासक्रमांचे प्रवेश तात्काळ रद्द केले आहेत.

या गंभीर गुन्ह्याबाबत पाचगाव पोलीस ठाण्यात आरोपींवर अनुसूचित जमाती प्रमाणपत्र (पडताळणीचे विनियमन) अधिनियम २००० च्या कलम १०, ११ व १२ सह भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ मधील फसवणूक व बनावट कागदपत्रे तयार करण्याशी संबंधित विविध कलमांनुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत . पोलिसांनी या प्रकरणात सखोल तपास करून ९ मुख्य आरोपींना जेरबंद केले असून, त्यांच्याविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र देखील दाखल करण्यात आले आहे  या रॅकेटमधील उर्वरित दोन फरार आरोपींचा शोध पोलीस पथकांद्वारे युद्धपातळीवर सुरू आहे. आमदार शंकर जगताप आणि नितीन पवार  यांनी या बोगसगिरीबाबत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता .
——————————

यावर बोलताना आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी सांगितले की, शासनाने अनुसूचित जमाती पडताळणी समितीची राज्यातील सर्व १७ कार्यालये आधुनिक व अद्ययावत केली आहेत. तसेच, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचे काटेकोर पालन व्हावे म्हणून कोणत्याही शिक्षण संस्थेने अनुसूचित जमाती वैधतेच्या अंतिम प्रमाणपत्राशिवाय राखीव जागेवर प्रवेश देऊ नयेत, असे कठोर निर्देश जारी करण्यात आले आहेत.

—————————————

हा केवळ एका कॉलेजपुरता मर्यादित प्रश्न नसून संपूर्ण महाराष्ट्रात बोगस आदिवासी दाखल्यांच्या आधारे शैक्षणिक प्रवेश, सरकारी नोकऱ्या आणि राजकीय लाभ मिळवण्याचे मोठे रॅकेट सक्रिय असल्याचे दिसून येत आहे . मूळ आदिवासी समाजाच्या हक्कांवर गदा आणणाऱ्या अशा दलालांवर आणि बोगस लाभार्थ्यांवर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा (ॲट्रॉसिटी ॲक्ट) अंतर्गत गुन्हे दाखल करून अत्यंत कठोर कारवाई करावी, अशी आग्रही मागणी आहे. भविष्यात अशा प्रकारच्या बोगस प्रमाणपत्र सादर करून होणाऱ्या प्रवेशांना आळा घालण्यासाठी ‘ऑनलाइन पडताळणी प्रणाली’ (डिजिटल वेरिफिकेशन सिस्टीम) विकसित करून ती एमएच-सीईटीच्या सर्व प्रवेश यंत्रणांशी जोडण्याची आणि या संपूर्ण प्रकरणाची एसआयटी (SIT) मार्फत सखोल चौकशी करण्याची मागणी केली.

शंकर जगताप
आमदार, चिंचवड विधानसभा

Author

Team News Beez

Follow Me
Other Articles
Previous

‘सत्तेचा माज वरून खालपर्यंत’; डोंबिवली-महाड प्रकरणावरून मनसेचा सरकारवर हल्लाबोल

Next

वडिलांना शिवीगाळ का केली विचारल्याने तरुणावर कोयत्याने हल्ला

No Comment! Be the first one.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECENT POSTS

  • शतक महोत्सवी मराठी साहित्य संमेलनासाठी शासनाकडून भरीव निधी मराठीच्या जागतिक प्रचारासाठी राज्य कटिबद्ध; उदय सामंत यांची घोषणा
  • अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी आरोपीला १० वर्षांची सक्तमजुरी विशेष पोक्सो न्यायालयाचा निर्णय; २५ हजारांचा दंड, निगडी पोलीसांच्या तपासाला यश
  • उद्या निगडीत वाहतुकीत बदल भक्ती-शक्ती परिसरात गर्दीची शक्यता; वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन
  • कॅप्टन अमोल महाडिक यांचा सहकाऱ्यांसह काँग्रेस पक्षात प्रवेश. आरक्षणाच्या मुद्द्यावरून जाती जातीत भांडणे पेटवण्याचा सरकारचा प्रयत्न
  • Pimpri-Chinchwad-पिंपरी चिंचवड लोडशेडिंगमुक्त करण्यासाठी आमदार शंकर जगताप यांचा “मास्टर प्लॅन”

CATEGORIES

  • Uncategorized (478)
  • क्राईम (264)
  • देश (42)
  • पिंपरी-चिंचवड (908)
  • पुणे (141)
  • मनोरंजन (1)
  • राजकीय (95)
  • राज्य (189)
  • हेल्थ (3)

Latest News

  • शतक महोत्सवी मराठी साहित्य संमेलनासाठी शासनाकडून भरीव निधी मराठीच्या जागतिक प्रचारासाठी राज्य कटिबद्ध; उदय सामंत यांची घोषणा
  • अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी आरोपीला १० वर्षांची सक्तमजुरी विशेष पोक्सो न्यायालयाचा निर्णय; २५ हजारांचा दंड, निगडी पोलीसांच्या तपासाला यश
  • उद्या निगडीत वाहतुकीत बदल भक्ती-शक्ती परिसरात गर्दीची शक्यता; वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन
July 31, 2026

शतक महोत्सवी मराठी साहित्य संमेलनासाठी शासनाकडून भरीव निधी मराठीच्या जागतिक प्रचारासाठी राज्य कटिबद्ध; उदय सामंत यांची घोषणा

Sumedh Chapalgaonkar

पुणे : शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या भव्य आयोजनासाठी राज्य शासनाकडून भरीव निधी उपलब्ध...

Read More
July 31, 2026
July 31, 2026

अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी आरोपीला १० वर्षांची सक्तमजुरी विशेष पोक्सो न्यायालयाचा निर्णय; २५ हजारांचा दंड, निगडी पोलीसांच्या तपासाला यश

Sumedh Chapalgaonkar

पिंपरी, दि. ३१ (प्रतिनिधी) – अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचाराच्या प्रयत्नप्रकरणी पिंपरी-चिंचवड येथील विशेष पोक्सो न्यायालयाने...

Read More
July 31, 2026
July 31, 2026

उद्या निगडीत वाहतुकीत बदल भक्ती-शक्ती परिसरात गर्दीची शक्यता; वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

Sumedh Chapalgaonkar

पिंपरी-चिंचवड ः साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त शनिवारी (१ ऑगस्ट) रोजी निगडीतील भक्ती-शक्ती...

Read More
July 31, 2026
July 31, 2026

कॅप्टन अमोल महाडिक यांचा सहकाऱ्यांसह काँग्रेस पक्षात प्रवेश. आरक्षणाच्या मुद्द्यावरून जाती जातीत भांडणे पेटवण्याचा सरकारचा प्रयत्न

Sumedh Chapalgaonkar

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांचे भाचे कॅप्टन अमोल महाडिक यांनी आज...

Read More
July 31, 2026
July 31, 2026

Pimpri-Chinchwad-पिंपरी चिंचवड लोडशेडिंगमुक्त करण्यासाठी आमदार शंकर जगताप यांचा “मास्टर प्लॅन”

Sumedh Chapalgaonkar

– महावितरणच्या ‘प्रकाश भवन’ कार्यालयामध्ये शहरातील वीज प्रश्नांवर महत्वपूर्ण बैठक – पिंपरी-चिंचवडसह राजगुरुनगर, लोणावळ्यासाठी नवीन...

Read More
July 31, 2026
July 30, 2026

सराईत वाहन चोरट्यांना अटक; पाच वाहने जप्त

Sumedh Chapalgaonkar

चिखली पोलिसांनी दोन सराईत वाहन चोरांना अटक केली. त्यांच्याकडून चार दुचाकी आणि एक रिक्षा अशी...

Read More
July 30, 2026
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Jul    
Copyright 2026 — Newsbeez. All rights reserved. Blogsy WordPress Theme