कारच्‍या धडकेत मॉर्निंग वॉकला गेलेल्या नागरिकाचा मृत्यू

पिंपरी, दि. १७ (प्रतिनिधी) – मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या एका ३८ वर्षीय व्यक्तीला अज्ञात कारने जोरात धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचा मृत्यू झाला. अपघातानंतर धडक देणारा कार चालक अपघातस्थळी न थांबता पळून गेला आहे. ही घटना शनिवारी (दि. १६ मे) रोजी सकाळी सव्‍वादहा वाजताच्‍या सुमारास बाणेर येथील मोहननगर भागात घडली आहे.
कुणाल विश्‍वासराव मोहिते (वय ३८) असे अपघातात मृत्‍यूमुखी पडलेल्‍या पादचारी व्‍यक्‍तीचे नाव आहे. ​याप्रकरणी अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्‍यात आला आहे. अभिषेक राजेंद्र धुमाळ (वय ३३, रा. कंबरे पार्क, कोथरुड) यांनी शनिवारी (दि. १६ मे) रोजी बावधन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ​पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीचे मेहुणे मयत कुणाल मोहिते हे शनिवारी सकाळी ७.१० च्या सुमारास प्लॅटीनम बिल्डींग समोर मॉर्निंग वॉक करत होते. यावेळी एका अज्ञात भरधाव कारने त्यांना जोरदार धडक दिली. या धडकेत कुणाल मोहिते यांचा मृत्यू झाला. अपघात केल्यानंतर चालकाने जखमीला कोणतीही मदत न करता किंवा पोलिसांना माहिती न देता तिथून पळ काढला. पोलीस उपनिरीक्षक ठाकरे या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *