Nashik-नदी स्वच्छतेत नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा; झाडे लावली तर नाशिकचा चेहरामोहरा बदलेल – गिरीश महाजन

नाशिक : राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी नाशिकच्या पर्यावरण संवर्धनासाठी नागरिकांनी पुढाकार घेण्याचे आवाहन केले आहे. नदी स्वच्छता मोहिमेत नागरिकांचा सक्रिय सहभाग वाढला, तर शहर अधिक सुंदर आणि स्वच्छ होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

गिरीश महाजन म्हणाले, “आपण नदी स्वच्छता मोहीम राबवत आहोत. जेव्हा नाशिककर यात सहभागी होतील, तेव्हा शहर सुंदर होईल. आपण सातत्याने झाडे लावत गेलो, तर नाशिकचा चेहरामोहरा निश्चितच बदलेल.”

पर्यावरण संवर्धन, नदी स्वच्छता आणि वृक्षारोपण ही केवळ शासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाने त्यात योगदान देणे आवश्यक असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले. नागरिकांच्या सहभागातूनच नाशिकला स्वच्छ, हरित आणि सुंदर शहर बनविण्याचे उद्दिष्ट साध्य होईल, असे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *