कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी पक्षातील फुटीर आमदार आणि खासदारांना लक्ष्य करत जोरदार इशारा दिला आहे. “तुम्हाला मला थांबवायचं असेल तर आधी मला मारावं लागेल. गद्दारीलाही मर्यादा असते. जर तुमच्यात हिंमत असेल, तर समोर या,” असे खुले आव्हान त्यांनी दिले.
ममता बॅनर्जी यांच्या या वक्तव्यानंतर पश्चिम बंगालच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. पक्षनिष्ठा, गद्दारी आणि राजकीय नैतिकतेच्या मुद्द्यावर त्यांनी कठोर भूमिका मांडत पक्षातील असंतुष्टांना थेट इशारा दिला.
ममता बॅनर्जी यांच्या या आक्रमक भूमिकेची आता राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू असून, त्यांच्या वक्तव्यावर विरोधकांकडून काय प्रतिक्रिया येते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
